Ganesh Chaturthi 2026: विधिवत Ganpati Sthapana विधी | Kalnirnay Marathi

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!

यंदा सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात Ganesh Chaturthi मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या मंगलदिनी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन होते.

Ganesh Chaturthi च्या दिवशी सर्वत्र एकाच वेळी प्रतिष्ठापना होत असल्याने अनेक घरांमध्ये पूजेसाठी ब्राह्मण किंवा गुरुजी वेळेवर उपलब्ध होणे कठीण जाते. तसेच, संस्कृत स्तोत्रे व मंत्रांचे उच्चार स्पष्ट करणे सर्वांनाच शक्य नसते. परंतु देव हा केवळ अवघड मंत्रांचा नाही, तर आपल्या मनातील निर्मळ भावाचा भुकेला असतो. म्हणूनच कोणत्याही क्लिष्ट मंत्रांशिवाय, शुद्ध अंतःकरणाने घरच्या घरी सोप्या मराठी भाषेत विधिवत Ganpati Sthapana (Ganesh Sthapana) आणि Pranpratishtha कशी करावी, याचा परिपूर्ण Ganeshpujan 2026 गाइड खालीलप्रमाणे आहे.

१. Ganpati Sthapana पूर्वतयारी व जागेची निवड

  • स्वच्छता व शुद्धीकरण: ज्या जागेवर बाप्पाची स्थापना करायची आहे ती खोली पूर्णपणे स्वच्छ करून त्यावर थोडे गोमूत्र शिंपडावे.
  • सजावट (Decoration): मखर किंवा आरास आदल्या दिवशीच तयार ठेवावी.
  • दिशेचे महत्त्व: गणेशमूर्तीचे मुख नेहमी पूर्व (East) किंवा पश्चिम (West) दिशेला राहील अशा पद्धतीने पाटाची मांडणी करावी.
  • पाट व आसन: चौरंग किंवा लाकडी पाटावर नवीन लाल किंवा स्वच्छ वस्त्र अंथरावे. त्यावर अक्षता किंवा तांदळाने स्वस्तिक काढून पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी.

२. Ganeshpujan 2026: आवश्यक पूजा साहित्य (Puja Samagri List)

पूजेला बसण्यापूर्वी सर्व साहित्य जवळ गोळा करून ठेवावे:

  • मूर्ती व कलश: मातीची (पार्थिव) गणेशमूर्ती, तांब्या/पितळेचा कलश, नारळ, आंब्याची डहाळी किंवा विड्याची पाने.
  • पूजेचे साहित्य: शुद्ध पाणी, पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर), तांदूळ/अक्षता (हळद-कुंकू लावलेले), हळदी-कुंकू, चंदन, अष्टगंध.
  • सुपारी व विडा: गणपतीचे प्रतीक म्हणून १ अखंड सुपारी, विड्याची पाने आणि विड्यावर ठेवण्यासाठी ५ गोष्टी (खारीक, बदाम, खोबरे, हळकुंड, नाणे).
  • फुले व पत्री: लाल जास्वंदाची फुले, दुर्वा, आघाडा, फुलांचा हार.
  • वस्त्र व जानवे: कापसाची वस्त्रमाळ, जानवे, बाप्पासाठी नवीन उपरणे.
  • दीप व नैवेद्य: २ समया (तेलाच्या), १ शुद्ध तुपाचा दिवा, कापूर, धूप, अगरबत्ती, मोदक, लाडू/पेढे, गूळ-खोबरे आणि ऋतूनुसार ५ फळे.
  • इतर उपकरणे: ताम्हण, पळी, पंचपात्र, हात पुसण्यासाठी स्वच्छ नॅपकिन.

३. Step-by-Step Ganesh Sthapana आणि पूजा विधी

पायरी १: मूर्तीचे आगमन व आसन (Ganesh Murti Aagman)

मूर्ती दुकानातून आणताना लाल वस्त्राने झाकून आणावी. पाटावर स्थानापन्न करताना शांत न बसता मोठ्या आवाजात “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” असा जयघोष करत मूर्ती पाटावरील स्वस्तिकावर विराजमान करावी. त्यानंतर मूर्तीवरील वस्त्र बाजूला करावे. घरातील कुलदेवता व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा.

पायरी २: दीपपूजन (Deep Pujan)

गणपतीच्या दोन्ही बाजूंना समई ठेवावी आणि पूजेच्या सुरुवातीला एक छोटा तुपाचा दिवा लावून त्याला हळद-कुंकू, अक्षता व फूल अर्पण करावे.

प्रार्थना: “हे दीपदेवा, आमच्या घरातील अंधकार दूर करून मांगल्याचा प्रकाश दे. मी तुला गंध, अक्षता आणि पुष्प अर्पण करतो.”

पायरी ३: शुद्धीकरण व आचमन (Aachman)

पुरुषांनी कपाळावर चंदनाचा टिळा व स्त्रियांनी हळदी-कुंकू लावावे. एका पात्रात शुद्ध पाणी घेऊन फुलाने सर्व पूजा साहित्यावर, सजावटीवर व स्वतःवर शिंपडावे.

त्यानंतर डाव्या हाताने पळीत पाणी घेऊन उजव्या हातावर घेत ३ वेळा प्राशन करावे:

  1. ओम केशवाय नमः (पाणी प्यावे)
  2. ओम नारायणाय नमः (पाणी प्यावे)
  3. ओम माधवाय नमः (पाणी प्यावे)
  4. ओम गोविंदाय नमः (उजव्या हातावरून पाणी ताम्हणात सोडावे)

(ही कृती दोनदा करावी. यामुळे मन आणि शरीराची शुद्धी होते.)

पायरी ४: पूजेचा संकल्प (Sankalp)

उजव्या हातात दोन पळी पाणी, अक्षता, हळद-कुंकू आणि एक फूल घ्यावे आणि म्हणावे:

“मी आज सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी माझ्या सहकुटुंबासह श्री गणेशाची कृपा, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि सर्व कार्यांत यश मिळवण्यासाठी हे Ganeshpujan 2026 करत आहे.”

असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे.

पायरी ५: कलश स्थापना (Kalash Sthapana)

गणपतीच्या उजव्या बाजूला तांदळाचे स्वस्तिक काढून त्यावर ८०% पाण्याने भरलेला कलश ठेवावा. कलशावर गंधाने स्वस्तिक व पाच उभी नामे काढावीत. कलशात हळद-कुंकू, अक्षता, एक नाणे, सुपारी, दुर्वा व फूल टाकावे. त्यावर ५ विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवून मध्यभागी नारळ (शेंडी वरच्या दिशेने) ठेवावा. कलश देवतेला गंध, अक्षता व फूल वाहून नमस्कार करावा.

पायरी ६: गणपतीचे प्रतीक — सुपारी पूजन व अभिषेक

मातीच्या मूर्तीवर थेट पाण्याचा अभिषेक करता येत नसल्याने ताम्हणात गणपतीचे प्रतीक म्हणून १ सुपारी ठेवावी:

  • आवाहन व आसन: सुपारीवर अक्षता वाहून बाप्पाला पूजेचे आमंत्रण द्यावे व आसन द्यावे.
  • अभिषेक: पळीने आधी शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृताने आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने सुपारीवर अभिषेक करावा. त्यानंतर हळद-कुंकू-गंध मिश्रित पाण्याने (गंधोदक) अभिषेक करावा.

अभिषेक झाल्यावर सुपारी कोरड्या वस्त्राने पुसून घ्यावी आणि गणपतीच्या उजव्या बाजूस दोन विड्याच्या पानांवर अक्षता ठेवून त्यावर ती सुपारी स्थापित करावी. तिला गंध, अक्षता आणि कापसाची वस्त्रमाळ घालावी.

४. मुख्य गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ganesh Murti Pranpratishtha)

बाजारातून आणलेली मूर्ती ही केवळ मातीची मूर्ती असते; तिच्यात ईश्वरी चैतन्य आणण्यासाठी ही विधी केली जाते:

  • आपला उजवा हात गणपतीच्या हृदयावर ठेवावा आणि डावा हात स्वतःच्या हृदयावर ठेवावा.
  • डोळे मिटून अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने म्हणावे:

“हे श्री गणेशा, मी माझ्या अंतःकरणातील चैतन्य आणि प्राण आपल्या या मूर्तीमध्ये स्थापित करत आहे. आपण या मूर्तीत विराजमान व्हावे आणि आमची ही साधी पूजा स्वीकारून सर्वांना सुख, समृद्धी व आशीर्वाद द्यावेत.”

यावेळी “ओम गं गणपतये नमः” चा मनोभावे जप करावा.

एक दुर्वा शुद्ध तुपात बुडवून मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांना (नेत्रांना), हातांना, पोटाला आणि चरणांना लावावी. यामुळे मूर्तीमध्ये देवत्व व प्राण प्रतिष्ठित होतात.

५. षोडशोपचार पूजा व नैवेद्य (Shodashopachara Pujan)

  • प्रतीकात्मक स्नान: फुलाने मुख्य मूर्तीवर थोडे शुद्ध पाणी, नंतर पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाणी शिंपडावे (प्रोक्षण करावे).
  • गंध व कुंकू: गणपतीच्या मस्तकावर चंदन किंवा अष्टगंध लावून हळद-कुंकू आणि अक्षता अर्पण कराव्यात.
  • जानवे व वस्त्र: डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली जानवे घालावे. त्यानंतर गळ्यात कापसाची वस्त्रमाळ घालावी.
  • लाल फुले व दुर्वा: बाप्पाला अतिप्रिय असणारे लाल जास्वंद, फुलांचा हार आणि दुर्वांची जुडी अर्पण करावी.
  • विडा व घंटा पूजन: गणपतीसमोर दोन विड्याच्या पानांवर खारीक, खोबरे, बदाम, हळकुंड, सुपारी आणि नाणे ठेवावे. घंटेला हळद-कुंकू वाहून तिची पूजा करावी.
  • धूप व दीप: बाप्पाला अगरबत्ती आणि तुपाचा दिवा ओवाळावा.
  • नैवेद्य समर्पण (Naivedya): जमिनीवर पाण्याचे चौकोनी मंडल करून त्यावर मोदक, लाडू, गूळ-खोबरे व फळांचे ताट ठेवावे. नैवेद्याभोवती तीन वेळा पाण्याचा फेरा मारून “हे बाप्पा, आमचा हा नैवेद्य आणि पिण्यासाठी हे अमृततुल्य जल आपण प्रेमाने स्वीकारावे,” अशी प्रार्थना करावी.

६. आरती, मंत्रपुष्पांजली आणि क्षमा प्रार्थना

  • आरती: सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन टाळ्या आणि घंटांच्या गजरात बाप्पाची आरती करावी.
  • प्रदक्षिणा: आरती झाल्यावर स्वतःभोवती उजवीकडून एक प्रदक्षिणा घालावी.
  • मंत्रपुष्पांजली: हातात फूल व अक्षता घेऊन गणपतीच्या चरणी अर्पण कराव्यात.
  • क्षमा याचना (Kshama Prarthana): सर्वात शेवटी हात जोडून म्हणावे:

“हे विनायका, मला मंत्र, तंत्र किंवा विधी येत नाहीत. मी केवळ भक्तीभावाने ही पूजा केली आहे. या पूजेमध्ये कळत-नकळत काही त्रुटी राहिली असल्यास मोठ्या मनाने क्षमा करावी आणि आपले कृपाछत्र सदैव आमच्या परिवारावर ठेवावे.”

त्यानंतर सर्वांना आरती दाखवून मोदकाचा प्रसाद वाटावा.

७. पुढील १० दिवस Ganeshpujan चे नित्य नियम

गणेशोत्सवाच्या संपूर्ण काळात दररोज सकाळी आणि संध्याकाळी:

  • समई व तुपाचा दिवा प्रज्वलित करावा.
  • बाप्पाला ताजे फूल, दुर्वा अर्पण करून अगरबत्ती दाखवावी.
  • गूळ-खोबरे किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून मनोभावे आरती करावी.

Ganesh Chaturthi हा भक्ती, आनंद आणि एकतेचा सण आहे. या मंगलदिनी गुरुजी उपलब्ध नसले तरी मनात कोणतीही शंका न ठेवता संपूर्ण श्रद्धेने आपण ही Ganpati Sthapana करू शकता. तुमचे Ganeshpujan 2026 मंगलमय होवो आणि विघ्नहर्ता गणराया तुमच्या घरातील सर्व संकटांचे निवारण करो!

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

Leave a Comment